संविधान धोक्यात आल्याच्या विरोधकांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी फडणवीसांनी (Devendra Fadnavis) देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्यावर टीका केली. “संविधान धोक्यात येणार हा दावा करणं मूर्खपणाचं आहे. भारताच्या रक्तात लोकशाही आहे. भारतातली लोकशाही संपवण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींनी (Indira Gandhi) केला होता. त्यांनी विरोधी पक्षांच्या लाखो नेते-कार्यकर्त्यांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगात ठेवलं. त्यानंतरही त्यांना भारतातली लोकशाही संपवता आली नाही. भारतातली लोकशाही कुणीच संपवू शकत नाही.” असं फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
काँग्रेस लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतेय
“गेल्या १० वर्षांपासून मोदींकडे पूर्ण बहुमत आहे. पण त्यांनी संविधानाचं रक्षण केलं. संविधान बदलण्याचा विचारही केला नाही.सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलंय की संविधानाची मूलभूत रचना बदलण्याचा अधिकार संसदेला आहे. त्यामुळे हा काँग्रेसचा जुमला आहे. जेव्हा विकास, जनहिताचं काम करता येत नाही, विश्वासार्हता संपलेली असते तेव्हा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.” असं फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)
काँग्रेसला माहिती आहे की ते निवडूनच येणार नाहीत
राहुल गांधीनाही (Rahul Gandhi) देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) खोचक शब्दांत लक्ष्य केलं. ‘सत्तेत आल्यास अग्नीवीर योजना रद्द करू’, असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “माझं काँग्रेसला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमचं ट्रॅक रेकॉर्ड दाखवा. काँग्रेसनं छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल, कर्नाटक या कुठल्याच ठिकाणी दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे त्यांना माहिती आहे की ते निवडूनच येणार नाहीत. त्यामुळे उद्या राहुल गांधी हे आश्वासनही देऊ शकतील की प्रत्येक नागरिकाला मी एक ताज महाल बांधून देईन.” असा टोला फडणवीसांनी लगावला. (Devendra Fadnavis)
हे पहा –
Join Our WhatsApp Community