यंदाच्या लोकसभा निवडुकीत भाजपने (Devendra Fadnavis) विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी निवृत्त सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujwal Nikam) यांना उमेदवारी दिली आहे. निकम हे तेच सरकारी वकील आहेत, ज्यांच्यामुळे दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा झाली. आता इतक्या वर्षांनंतर निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस निकम यांच्यावर गंभीर आरोप करत आहे. या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सनसनाटी पलटवार केला आहे.
काँग्रेसला मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्या अजमल कसाबची चिंता
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “उज्ज्वल निकमसारख्या देशभक्ताला आम्ही तिकीट दिले, त्यामुळे काँग्रेस नेते उज्ज्वल निकम यांनी अजमल कसाबची बदनामी केल्याचे सांगतात. म्हणजे काँग्रेसला मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्या अजमल कसाबची चिंता आहे. आमची महायुती उज्ज्वल निकमांसारख्या देशभक्तासोबत आहे, तर महाविकास आघाडी अजमल कसाबसारख्या दहशतवाद्यांसोबत आहे. कोणाच्या पाठीशी उभे राहायचे हे मतदाराने ठरवावावे.” असं फडणवीस यावेळी म्हणाले. (Devendra Fadnavis)
नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
वकील उज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसने 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उकरुन काढला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दावा केला की, 26/11 हल्ल्यात शहीद झालेले IPS अधिकारी हेमंत करकरे (Hemant Karkare) यांच्यावर कोणत्याही दहशतवाद्याने नाही, तर RSS समर्थित पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या आणि ही गोष्ट देशद्रोही उज्ज्वल निकम यांनी लपवून ठेवली. देशद्रोही व्यक्तीला तिकीट देणारा भाजप देशद्रोह्यांना पाठिंबा देणारा पक्ष आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. (Devendra Fadnavis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community