Devendra Fadnavis आजच मोठा निर्णय घेणार? नेमकं काय घडतय?

255
Devendra Fadnavis आजच मोठा निर्णय घेणार? नेमकं काय घडतय?
Devendra Fadnavis आजच मोठा निर्णय घेणार? नेमकं काय घडतय?

महाराष्ट्र भाजपामध्ये (Devendra Fadnavis) आज (6 जून) मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजपाप्रणीत NDA कडे बहुमताचा आकडा आहे. NDA च संख्याबळ 292 आहे. भाजपाने या निवडणुकीत 400 पारचा नारा दिला होता. प्रत्यक्षात त्यांना 240 जागा मिळाल्या. भाजपाला (BJP) उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात मोठा फटका बसला. 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्रात महायुतीचे 40 पेक्षा जास्त खासदार निवडून आले होते. 2024 मध्ये महायुतीचा आकडा फक्त 17 आहे. त्यात भाजपाला फक्त 9 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे मागच्या दोन निवडणुकांपेक्षा भाजपाची कामगिरी खूप खराब आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपामध्ये काही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. (Devendra Fadnavis)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (५ जून) पत्रकार परिषद घेत भाजपाच्या पराभवाची जबाबदारी आपल्यावर घेतली. आपला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे देणार असल्याचं फडणवीस म्हणाले होते. दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीत जाऊन फडणवीस (Devendra Fadnavis) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांची आजच भेट घेतील अशी माहिती आहे. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेऊ शकतात. कारण त्यांनी काल उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवली होती. (Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“पराभवाची जबाबदारी माझी आहे. मी स्वीकारतो. मी मान्य करतो, मी स्वत: कमी पडलोय. भाजपाला झटका बसला. महाराष्ट्रात जो पराभव झाला, त्याची सगळी जबाबदारी देवेंद्र फडणवीस म्हणून मी स्वीकारतो. आता मला विधानसभेकरता पूर्णवेळ उतरायच आहे. मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती करणार आहे की, मला सरकारमधून मोकळ करावं. जेणेकरुन, मला पूर्णवेळ पक्षासाठी काम करण्याची संधी मिळेल. मी हरणार नाही. पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार.” असं काल देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. (Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.