वर्षभरापूर्वी सरकार बदललं आणि दोन सरकारमधला फरक काय आहे? मागचं सरकार होतं, सरकार आपल्या घरी आणि आताचं सरकार आहे, ते सरकार तुमच्या दारी, हा महत्त्वाचा फरक दोन सरकारमधला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पालघमधील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, ‘वर्षभरापूर्वी सरकार बदललं आणि दोन सरकारमधला फरक काय आहे? मागचं सरकार होतं ते सरकार आपल्या घरी, आताचं सरकार आहे, ते सरकार तुमच्या दारी. हा महत्त्वाचा फरक दोन सरकारमधला आहे. एक सरकार स्वतःचं घरी बसलं होत, हे सरकार मात्र तुमच्या दारामध्ये येऊन तुमचे अधिकार, तुमचे लाभ हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. खरं म्हणजे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या निमित्ताने असं ठरवलं होत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान ७५ हजार लाभार्थ्यांना लाभ मिळायला पाहिजे. मात्र आमच्या जिल्हा प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी सांगितलं, नाही. ७५ हजार नाही, आम्ही दीड लाख लाभार्थ्यांना आम्ही लाभ देऊ. पालघर जिल्हा तर दोन लाखांच्या पलिकडे चालला आहे, ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. शेवटी जनसामान्यांचं सरकार हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे.’
(हेही वाचा – दोनवेळा राज्यसभा मिळाल्यानंतर ‘या’ भाजप मंत्र्यांना लढवावी लागणार लोकसभेची निवडणूक)
पुढे फडणवीस म्हणाले की, ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ९ वर्षांमध्ये या देशात काही बदल केला असेल, तर या देशाची त्यांनी वितरण व्यवस्था बदलवली. ज्या वितरण व्यवस्थेमध्ये २०१४पूर्वी लाभार्थ्याला लाभ द्यायचा असेल तर त्याला आधी लाभ द्यावा लागायचा. आणि मग त्याला लाभ मिळायचा. आता मोदींजी सांगितलं, लाभार्थ्यापर्यंत लाभ स्वतः पोहोचेल, मध्ये कोणीही राहणार नाही, कोणीही दलाली करणार नाही. थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था मोदीजींनी उभी केली. आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर आम्हीही हेच ठरवलं की, थेट लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविले पाहिजे. आता कोणीही मध्ये येणार नाही, कोणीही दलाली करणार नाही. कोणाला लाभ देण्याची आवश्यकता नाही, लाभ घेण्याची आवश्यकता प्रत्येक व्यक्तीची त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून अतिशय चांगला उपक्रम हा या ठिकाणी करतो आहोत.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community