2024 ला बहुमताचं सरकार येणार, फडणवीसांचा गोव्यातून ‘मविआ’ला इशारा

131

डॉ. प्रमोद सावंत यांचा गोव्यात आज शपथविधी सोहळा झाला. यावेळी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. माध्यमांशी संवाद साधताना गोव्याला पुरोगामी आणि स्थिर विचाराचे सरकार मिळाले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात 2024 मध्ये बहुमताचे भाजप सरकार येईल, असाही विश्वास व्यक्त केला. फडणवीस यांनी गोव्यातून महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्रातील भाजप नेते देखील यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रात 2024 मध्ये भाजप बहुमताचं सरकार

मला अतिशय आनंद आहे की भाजपचं सरकार आलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. अतिशय स्थिर, स्टेबल सरकार आलेलं आहे. गोव्यात स्थिर आणि पुरोगामी विचाराचं सरकार आलेलं आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. महाराष्ट्रात 2024 मध्ये भाजप बहुमताचं सरकार असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – बंगाल विधानसभेत भाजप-टीएमसी आमदारांत तुंबळ हाणामारी!)

राऊतांना एवढं महत्व देण्याची गरज नाही

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना एवढं महत्व देण्याची गरज नाही तर, तुम्हीही वेळ खराब करू नका आणि माझाही वेळ वाया घालवू नका, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. संजय राऊत यांना इतकं महत्त्व का देता ? ते सरकारचे प्रतिनिधी आहेत का?, विश्ववेत्ते आहेत का? संजय राऊत यांच्या विचारांना सुप्रीम कोर्टानं कचऱ्याच्या डब्यात फेकण्यासारखं म्हटले आहे, तुम्ही माझा वेळ खराब करु नका आणि तुमचाही वेळ खराब करु नका, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.