मी मुख्यमंत्री नसल्याचे वाटतच नाही! असे का म्हणाले फडणवीस?

आगामी मनपा निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद पुन्हा मिळेल आणि नवी मुंबईची सेवा करण्यासाठी आमच्या नेत्यांची टीम पुन्हा आपल्या सेवेत येत्या काळात आपल्याला पहायला मिळेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मागील 2 वर्षे मी एकही दिवस घरात न थांबता जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिले नाही की मी मुख्यमंत्री नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई येथे केले. नवी मुंबईतील बेलापूर येथे मासळी विक्रेत्या महिलांना परवाना वाटपाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मंदा म्हात्रे, गणेश नाईक, नरेंद्र पाटील, रमेश पाटील तुमच्यासारखे नेते पाठीशी असल्याने मला एकही दिवस जाणवले नाही की मी मुख्यमंत्री नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचे नाही, तर तो काय करतो हे महत्त्वाचे आहे. आपले सरकार असताना अनेक योजना राबवल्या. नवी मुंबईत गणेश नाईक असोत किंवा आमच्या मंदा म्हात्रे असतील यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे या शहराचा विकास झाला आहे. देशातील सर्वात शहर असेल, वेगवेगळ्या स्पर्धा असतील हे शहर नेहमीच अग्रेसर राहिले आहे. मला विश्वास आहे की, आगामी मनपा निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद पुन्हा मिळेल आणि नवी मुंबईची सेवा करण्यासाठी आमच्या नेत्यांची टीम पुन्हा आपल्या सेवेत येत्या काळात आपल्याला पहायला मिळेल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा : वारकरी शिल्पाची समाजकंटकांकडून मोडतोड! ठाकरे सरकारविरोधात संताप)

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप एकत्र लढले. मात्र निकाल घोषित होताच शिवसेने भाजपाची साथ सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबत जाऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केली आणि भाजपाला विरोधी बाकावर बसावे लागले. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षाचे नेते बनले. मात्र तरीही फडणवीस यांचा दांडगा जनसंपर्क, प्रशासकीय कामाचा अनुभव, नेतृत्व यामुळे आजही त्यांनी जनतेशी जोडलेली नाळ तोडली नाही, यामुळेच विरोधी बाकावर बसूनही फडणवीस हे २ वर्षे एकही दिवस घरी बसले नाही, या त्यांच्या वक्तव्याचा अर्थ उमगतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here