देवेंद्र फडणवीस म्हणतात, आमच्या कुटुंबातील मी राजकारणातला शेवटचा व्यक्ती असेल!

160
आमच्या कुटुंबाचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला माझ्यानंतर आमच्या कुटुंबातील कुणी राजकारणात येईल असे वाटत नाही. आमच्या कुटुंबातील मी शेवटचा राजकारणातला व्यक्ती असेल, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा महाकट्ट्यावर ते बोलत होते. माझे वडील जेव्हा राजकारणात होते, तेव्हा मला अजिबात वाटत नव्हते की मी राजकारणात येईन, मी वकील होणार होतो, पण लॉ करत असताना शेवटच्या वर्षात मी नगरसेवक बनलो आणि माझा आयुष्याचा ट्रॅक बदलला. जसे माझ्या वडिलांनी मला कधी राजकरणात येण्यासाठी आग्रह केला नव्हता, तसा मीदेखील माझ्या कुटुंबाला आग्रह करणार नाही. पण उद्या जर अमृताला किंवा कुणाला राजकारणात यावेसे वाटले तर माझा त्याला विरोध नसेल, पण मला वाटत नाही कुणी राजकारणात येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र पंतप्रधान मोदींच्या मागे उभा राहिला!  

दिल्लीच्या पदावर कधी ना कधी मराठी माणूस बसेलच, मराठी माणसाला कोण थांबवू शकते. एक दिवस नक्कीच मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर बसेल. कारण दिल्लीच्या तख्ताला सगळ्यात पहिले आव्हान मराठी माणसानेच दिले होते आणि दिल्लीचा तख्तही मराठी माणसानेच काबीज केला होता, आपण आता ती वेळ नाही. कारण आता आपल्या देशाला पंतप्रधान मोदी यांच्या सारखे चांगले पंतप्रधान मिळाले आहेत. आपल्या देशाला जगात गौरव मिळत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र देखील त्यांच्या पाठीशी उभा आहे. आपण 2014 आणि 2019 ला महाराष्ट्र मराठी माणसाला पंतप्रधान बनवा या विचारापेक्षा मोदींना पंतप्रधान बनण्याच्या विचारामागे उभा राहिला होता, असे सांगत फडणवीस यांनी ते पंतप्रधानांच्या शर्यतीत आहेत का, या प्रश्नाला कलाटणी दिली. मला कोणत्याच पदाची महत्वकांक्षा नाही. ज्या दिवशी नगरसेवक झालो. त्यादिवशी असे वाटले की यापेक्षा मोठे काय असू शकतो. परत महापौर झालो, आमदार झालो. मुख्यमंत्री होईल असे कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते. मी फार समाधानी आहे. जे काही मिळाले ते भरपूर आहे. क्षमतेपेक्षा पक्षाने मला जास्त दिले असल्याचे फडणवीस म्हणाले. पक्ष जी जबाबदारी देऊल त्यामध्ये 100 टक्के द्यायचे असेच माझे काम असल्याचे फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.