राज्यातील सध्याची जी परिस्थिती सुरू आहे, हे पाहून राज्यातील जनतेच्या मनात आता राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी, अशी भावना निर्माण झाली आहे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
राज्याची परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. तर देशात लोकशाही आहे. कोणी हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येत असेल, तर विरोध का,.पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येऊन सूड उगवण्याचे काम करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था नाही. खून होत आहेत. दरोडे पडत आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट येणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.
(हेही वाचा सोनिया गांधींच्या औषधोपचारासाठी एमएफ हुसेनचे पेंटिंग खरेदी करण्यास गांधी कुटुंबाने टाकलेला दबाव)
भाजप राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार नाही
राज्यात सध्या विविध मुद्द्यांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसावरून ठाकरे सरकारला घेरले आहे. अशातच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने वादात आणखीन भर पडली. परिणामी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रपती राजवटीच्या वक्तव्याने चर्चेला उधाण आले आहे.भाजप राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार नाही, राष्ट्रपती राजवटीचा निर्णय हा राज्यपालांचा असतो, भाजप संघर्ष करत मोठा झालेला पक्ष आहे, आम्ही लढत राहू, असेही फडणवीस म्हणाले आहेत. परिणामी राज्यात चालू असलेला गोंधळ अधिक वाढण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community