उद्धव ठाकरेंची नागपूरचा कलंक ही टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मंगळवारी ठाकरेंवर अत्यंत तिखट शब्दांत पलटवार केला. माझे माजी मित्र उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती चांगली नाही. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. त्यांची स्थिती आपण समजून घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आमचे आजचे विरोधक व माजी मित्र उद्धव ठाकरे यांच्यावर सध्याचा राजकारणाच फारच विपरित परिणाम झाला आहे. कदाचित त्यांना मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागेल की काय? अशी स्थिती आहे. या मानसिक स्थितीतून ते बोलत असतील, तर त्याच्यावर फार काही बोलणे योग्य ठरणार नाही. त्यांची स्थिती सर्वांनी समजून घेतली पाहिजे.
(हेही वाचा ‘मी एक शब्द बोललो, तर तळपायाची आग मस्तकाला का गेली?’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल)
नागपुरात काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नागपुरातील कायकर्ता मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यात त्यांनी त्यांचा उल्लेख नागपूरचा कलंक म्हणून केला होता. तेव्हापासून भाजपने ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहेत. ते आता उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचा दावा करत आहेत. उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? 2014 ते 2019 तुमच्याबरोबर सत्तेत होतो. 2014 साली शिवसेनेने नाही, तर तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो. तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे माझी नाही, असे ठाकरे म्हणाले होते.
Join Our WhatsApp Community