Devendra Fadnavis म्हणतात,…पुन्हा येणार!

176
Devendra Fadnavis म्हणतात,…पुन्हा येणार!
Devendra Fadnavis म्हणतात,…पुन्हा येणार!
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन असे सांगणाऱ्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा सत्तेत येता आले नाही. परंतु शिवसेनेत फुट पडल्यानंतर राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केल्यानंतर फडणवीस यांना मुख्यमंत्री बनता आले नाही आणि उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. परंतु आता २०२४च्या निवडणुकीला सामोरे जाताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मी पुन्हा येईन असे न म्हणतात आम्ही पुन्हा येवू असे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल असे भाकीत करताना फडणवीस यांनी आम्ही पुन्हा येणार असे म्हटले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची एका दुरचित्रवाहिनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाचे १४ उमेदवार व्होट जिहादच्या नावाखाली पाडले असल्याचा आरोप केला आहे. मुंबईतील ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई या दोन लोकसभा मतदार संघासह राज्यातील १४ लोकसभा मतदार संघात मुस्लिम मतांमुळे महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. मशिदींमधून फतवे निघाल्याने महायुतीच्या विरोधात मतदान झाले. खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जाहीर सभेत हे फतवे दाखवून दिले. त्यामुळे हा लव जिहाद असून या मुस्लिम मतांच्या जिवावर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत, असे फडणवीस यांनी या मुलाखती म्हटले.

(हेही वाचा – Share Market Bloodbath : भारतीय शेअर बाजारात एकाच दिवसांत तब्बल २ टक्क्यांची घसरण)

मी मला पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत असून जर पक्षाने उद्या सांगितले की घरी बस तरी मी घरी स्वस्थ बसेन. भाजपा १५० जागा लढवणार असल्याचे सांगून तिन्ही पक्षांमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल. परंतु महायुती म्हणून निवडणूक लढायची असून कोणा पक्षाच्या उमेदवाराला पाडून आपल्या पक्षाचे उमेदवार जास्त निवडून यावे यासाठी जर प्रयत्न झाला तरी महायुतीचे नुकसान होईल हे आम्ही तिन्ही पक्षाला लक्षात ठेवायला हवे असेही त्यांनी म्हटले आहे.

सन २०१९मध्ये शिवसेनेसोबत युतीमध्ये जागा वाटप करताना कुठे बंडखोरी होईल याचीही यादी घेऊन आम्ही बसलो होतो. त्यात दोन्ही पक्षाकडून बंडखोरी होऊ नये यासाठी प्रयत्न केला तरीही बंडखोरी झाली, परंतु आता महायुतीत अशी बंडखोरी होणार नाही याची अधिक काळजी घेतली जाईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.