विनाअनुदानित शाळांचा प्रश्न, भीक, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे! विधानसभेत खडाजंगी

180

भाजपचे नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु करताना झोळी पसरवून भीक मागितली, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हा विषय चर्चेला आला. निमित्त होते विनाअनुदानित शाळांना निधी देणे. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी, मग विनाअनुदानित शाळांसाठी झोळी पसरवून निधी जमवायचा का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘माझी जीवन गाथा’ या पुस्तकाचा हवाला देत, प्रबोधनकार ठाकरे यांनीही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या, असे म्हटल्याचे सांगत विरोधकांवर पलटवार केला.

विनाअनुदानित शाळांना निधी देण्याच्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यापुढे विनाअनुदानित शाळा स्वयंपूर्ण होतील असाच शासनाचा प्रयत्न असणार आहे. कारण सरकारला अनुदानित शाळा देता येणारच नाही. हा आपला कायदा आहे. त्यामुळे त्यामध्ये ही अडचण येणार नाही. तथापि जसे शिक्षणाचे, शिक्षकांचे हित आपल्याला बघायचे आहे, तसे राज्याचेही हित बघायचे आहे. राज्यातील इतर घटकांनाही सोयी पुरवण्याची आपल्यावर जबाबदारी आहे, असे फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा Savarkar’s portrait unveiled in Karnataka Assembly : काँग्रेसला कर्नाटक विधानसभा संसदेपेक्षा मोठी वाटते का?)

प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा दिला हवाला 

त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, शाळा काढल्यानंतर त्या शाळांचा, शिक्षकांचा खर्च भागवायचा असेल तर पैसा तर पाहिजेच. तर त्यासाठी निधी जमवण्यासाठी भीक मागून अशा रितीने निधी जमवला तर परवानगी आहे का?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सगळ्यांसाठी पूजनीय असलेले प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘माझी जीवन गाथा’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे की, ‘आमच्या बरोबर भीक मागायला कोण येणार?’ शिक्षणाची सोय, विद्यार्थ्यांची सोय यावर त्यांनी उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘गावभर या योजनेची चर्चा, चिकित्सा सुरु झाली. कोणत्याही कार्यासाठी फंड जमा करणारे एकार्थी भीकच मागतात ना, मग द्रव्या आधी धान्य मागितले तर त्यात काय चुकले? फंडवाले आरोळी मारत नाही, धान्यवाले आरोळी मारतात. याठिकाणी जाग आणतात. भीक मागितली तर काय वाईट आहे?, असे प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिले असल्याचे फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.