‘त्यांचं दुःखच वेगळं आहे’, फडणवीसांचा पवारांवर घणाघात

91

एकीकडे सत्तांतरानंतर राज्यात भाजप सत्तेत आले आहे. तर दुसरीकडे बिहारमध्ये नितीश कुमार यांनी दगा दिल्यामुळे भाजपला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप आपल्या मित्र पक्षांना संपवण्याचं काम करतं, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. त्याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

पवारांचं दुःख वेगळं

आमचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत 50 आमदार आहेत आमच्यासोबत 115 आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांना आम्ही मुख्यमंत्रीपद दिले आहे. त्यांच्या 9 आणि आमच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे शरद पवार यांचं दुःख जरा वेगळं आहे आणि ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

(हेही वाचाः ‘त्यांचा काळी जादू करण्याचा प्रयत्न, पण…’, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा)

काय म्हणाले होते पवार?

भाजप त्यांच्या बरोबर असलेल्या मित्र पक्षांना हळूहळू संपवतात ही नितीश कुमार यांची तक्रार आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप अनेक वर्ष एकत्र होते. आज शिवसेना फोडून शिवसेनेची अवस्था दुबळी करण्याची व्यवस्था भाजपने केली, त्याला एकनाथ शिंदे आणि इतर लोकांची मदत मिळाली. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेवर त्यांच्या एकेकाळच्या मित्र पक्ष असलेल्या भाजपनेच आघात केल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.