राज्यात अतिवृष्टीने बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्राने गेल्या दीड वर्षांत बऱ्याच नैसर्गिक आपत्ती पाहिल्या आहेत. झालेल्या अतिवृष्टी, वादळ आणि महापूराने बळीराजावर दुखाःचा डोंगर कोसळला त्याचे अतोनात हाल झाले. या नुकसाची भरपाई न मिळाल्याने विरोध पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पीक विमा आणि नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई हा मुद्दा आगामी निवडणुकांकरता भाजपाच्या प्रचार सभांमधील महत्त्वाचा अजेंडा असणार असल्याचे एकंदर दिसतंय. याच मुद्द्यावरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ठाकरे सरकारवर चांगलाच टोला लगावला आहे.
अद्याप बळीराजाला पीक विम्याची रक्कम नाही
नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी या ठिकाणी देगलूर पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, बळीराजाचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले, मात्र अद्याप बळीराजाला पीक विम्याची कोणतीही पुरेशी रक्कम मिळालेली नाही. इतकेच नाही तर ते असेही म्हणाले, भाजप सत्तेत असताना त्यांच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किती रक्कम पुरविली, हे देखील त्यांनी आपल्या भाषणात मांडले.
(हेही वाचाः सानुग्रह अनुदानाचा महापालिका प्रशासन आणि महापौरांना विसर)
हे सरकार लबाड आहे…
ठाकरे सरकार स्वतः भ्रष्टाचार करत आहे आणि मदतग्रस्तांना मदत पुरविण्याची वेळ आली की, केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे, असा हल्लाबोल फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केला. इतकेच नाही तर हे सरकार इतकं लबाड आहे, काहीही झाले तरी हे सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. यांच्या बायकोने जरी यांना मारलं तरी हे सांगतील केंद्र सरकारचाच हात आहे, असे लबाड लोकं इथे आहेत, असे बोलून फडणवीसांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले.
Join Our WhatsApp Community