उद्धव ठाकरेंच्या बेईमानीमुळे आजची परिस्थिती निर्माण झाली; Devendra Fadanvis यांचा घणाघात

178

उद्धव ठाकरे हे भाजपासह युती करुन विधानसभेची निवडणूक २०१९ मध्ये निवडून आले. उद्धव ठाकरेंचे फोटो तेव्हा स्टँपसाईज आणि मोदींचे फोटो लाइफसाईज असायचे. सगळ्या निवडणूक प्रचारात मोदींचे फोटो लावून निवडून आले. तसंच त्यावेळी प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा हे सगळे सभांमधून सांगायचे की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील. त्यावेळी उद्धव ठाकरे त्यांच्या सभांमधून हेच सांगायचे. पण निकालाचा दिवस उजाडला आणि संख्याबळ समोर आलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की गणित बसणार नाही. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीला निवडणुकीच्या आधीच बरोबर घेतलं होतं. ती तयारी अशासाठी होती की थोडं भाजपाला खाली आणू. पण संख्याबळ पाहिलं तशी उद्धव ठाकरेंनी बेइमानी केली. त्यानंतर ते काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले आणि त्यांनी सरकार स्थापन केले, त्यांच्या बेईमानामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली, असा घणाघाती हल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांनी केला.

(हेही वाचा Palghar LS constituency : पालघरमध्ये भाजपाला मतविभागणीचा लाभ)

२०१९च्या निवडणुकीआधीपासूनच ठाकरेंची शरद पवारांशी सल्लामसलत 

एबीपी माझाच्या माझा व्हिजन या विशेष कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. शरद पवारांशी उद्धव ठाकरेंनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच संधान साधलं होतं. कारण जिथे काँग्रेसविरोधात शरद पवारांचा पक्ष लढत होता तिथे उद्धव ठाकरेंना मदत करायची आणि शरद पवार जिथे भाजपा विरोधात लढत आहेत तिथे उद्धव ठाकरेंनी मदत करायची असं त्यांचं ठरलं होतं. यामागे असलेलं लॉजिक शरद पवारांनी त्यांना समजावलं होतं. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की एकट्या भाजपाच्या १३० जागा येऊ शकतात. त्या आल्या तर भाजपा तुम्हाला विचारणार नाही त्यामुळे आपण एकमेकांना मदत केली तर भाजपाच्या जागा कमी होतील. आमच्या जागा वाढल्या तर विरोधी पक्ष म्हणून आम्हीही भाजपावर अंकुश ठेवू. पुण्यात आम्ही जेव्हा हरलो तेव्हाची अख्खी शिवसेना राष्ट्रवादीच्या मागे उभी होती. असे प्रकार अनेक ठिकाणी आमच्या लक्षात आले, असेही देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadanvis) म्हणाले.

लोकसभा निवडणूक देशाची आहे, त्यामुळे आम्ही मोदींच्या नावेच मतं मागणार, एनडीएचं कुणीही निवडून आलं तरीही त्याचं मत हे मोदींनाच मिळणार आहे. यूपीएचं कुणी निवडून आलं तर त्याचं मत हे राहुल गांधींना मिळणार आहे. असं आपण समजू कारण त्यांचा नेता अद्याप ठरलेला नाही. निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच आहे. शांतपणे निवडणूक चालली आहे असं जे वाटतं आहे तर त्याचं कारण आहे. २०१४ मध्ये एक आशा असणारा मतदार होता त्याने मोदींना मतदान केलं. २०१९ मध्ये मतदारांनी पाच वर्षांमधलं मोदींचं काम पाहिलं आणि मतदान केलं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हा मतदार भाजपाचा मतदार झाला आहे. जो तुमचा मतदार असतो तो शांतपणे मतदान करतो. आमचे जे मतदार आहेत त्यांच्या मनात मोदींना निवडून द्यायचं हे पक्कं आहे, असेही देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadanvis) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.