राहुल गांधी यांनी ना सावरकर (Veer Savarkar) यांना वाचले आहे ना त्यांना समजून घेतले आहे. त्यामुळे ते सावरकर (Veer Savarkar) यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत असतात. म्हणून आपण राहुल गांधी यांना आवाहन करतो की, त्यांनीही स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट पहावा. जर राहुल गांधी हा सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त करत असतील तर त्यांच्यासाठी मी स्वखर्चाने सगळे सिनेमागृह आरक्षित करून देईन. हा सिनेमा पाहिल्यावर ते जे वीर सावरकर यांच्याविषयी बिनबुडाचे बोलतात ते बोलणे बंद करतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला चित्रपट
वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या जीवनावर आधारित वास्तववादी सिनेमा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाकडे मोठ्या प्रमाणात प्रेक्षक संख्या आकर्षित होत आहे. शनिवार, ३० मार्च रोजी या चित्रपटाचा मराठी भाषेत डब केलेला प्रीमियर शो अंधेरी येथील सिनेमागृहात आयोजित करण्यात आला होता. हा सिनेमा पाहण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. हा सिनेमा पाहिल्यावर त्यांनी राहुल गांधी यांना वरील आवाहन केले. या प्रीमियर शोला चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि वीर सावरकर (Veer Savarkar) यांची प्रमुख भूमिका केलेले रणदीप हुड्डा हेही उपस्थित होते. या शिवाय या चित्रपटात वीर सावरकरांचे संवाद मराठीत बोललेले अभिनेता सुबोध भावे हेही उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community