भाजपचे ‘मिशन महाराष्ट्र…’ बारामती सुद्धा महाराष्ट्रातच येते, फडणवीसांचे सूचक विधान

158

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आता भाजपने कंबर कसली आहे. तसेच 2024च्या निवडणुकांसाठी भाजपने तयारी केली असून, मिशन महाराष्ट्र तयार केले आहे. त्यानुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या बारामतीला सुद्धा धक्का देण्याचा विचार भाजपने केला असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

बारामती महाराष्ट्रातच

भाजपने मिशन महाराष्ट्र अंतर्गत 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 150 आमदार आणि लोकसभा निवडणुकीत 42 खासदार निवडून आणण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यामुळे भाजपचे पवारांच्या बारामतीवर देखील लक्ष आहे का, यावर फडणवीसांनी भाष्य केले आहे. भाजपचे मिशन इंडिया आहे, महाराष्ट्र भाजपचे मिशन महाराष्ट्र आहे. बारामती महाराष्ट्रात येते, त्यामुळे मिशन महाराष्ट्रमध्ये बारामती आहे, असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचाः ‘मी दोन-अडीच वर्ष ठोकतोय, काय केलं यांनी मला?’, पडळकरांचा पवारांवर हल्लाबोल)

मुंबई महापालिकेवर भगवा फडकणार

मनसे-शिंदे गटाच्या युतीच्या चर्चा होत असतानाच या चर्चांना फडणवीस यांनी पूर्णविराम लावला आहे. पत्रकारांची पतंगबाजी पाहताना मला देखील मज्जा येते. ज्याला जे मनात येईल ते दाखवतो. त्यामुळे भाजप आणि खरी शिवसेना म्हणजेच शिंदे गट एकत्रितपणे निवडणूक लढवून मुंबई महापालिकेवर भगवा फडकवू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.