मी महाराष्ट्रात तुम्हाला नकोय का? फडणवीसांचा थेट सवाल

131

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. पक्षादेश म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी हे मान्य देखील केले. त्यानंतर फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू झाली. यावरुनच आता देवेंद्र फडणवीस यांनी सवाल केला आहे.

तुमची अशी इच्छा का आहे?

पुणे-पिंपरी चिंचवड (पीएमपीएल) अंतर्गत 150 इलेक्ट्रिक बसेस आणि चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी माध्यमांशी फडणवीसांनी संवाद साधला. केंद्रात पाठवण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांनी माध्यमांना प्रतिप्रश्न केला आहे. मी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी तुमची इच्छा का आहे. मी महाराष्ट्रात तुम्हाला नकोय का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

(हेही वाचाः ‘प्रत्येक शिवभक्तासाठी हा अभिमानाचा क्षण’, नौदलाच्या नव्या ध्वजाबाबत फडणवीसांनी मानले मोदींचे आभार)

वादाचे विषय काढू नका

पुणे महापालिकेचे दोन भाग करण्याची गरज असल्याचे विधान कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्याबाबत देखील फडणवीसांनी भाष्य केले आहे. अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव सध्या आपल्याकडे नाही. त्यामुळे कोणतेही वादाचे विषय काढू नका, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

फडणवीस-चव्हाण भेट नाही

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. या चर्चांना देखील फडणवीसांनी पूर्णविराम लावला आहे. माझी आणि अशोक चव्हाण यांची कुठलीही बैठक झाली नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.