रामाच्या शरणी जाणा-याला…, राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी विरोध केला आहे. त्यामुळे त्यांच्या या विरोधावरुन आता मनसैनिक नाराज आहेत. याच मुद्द्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे. रामाच्या चरणी जो जात असेल त्यांना विरोध करण्याचे कारण नाही, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

रामाच्या शरणी जाणा-याला विरोध नको

ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधाचं कारण नेमकं काय आहे हे मला माहीत नाही. माझे त्यांच्याशी याबाबतीत कुठलेही बोलणे झालेले नाही. पण रामाच्या शरणामध्ये जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे. रामाच्या शरणी जाणा-या कोणालाही रोखण्याचं किंवा त्यांना विरोध करण्याचे कुठलेही कारण नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः राज ठाकरेंना आव्हान देणा-या भाजप खासदाराने अनेकांना ‘असमान’ दाखवलं आहे)

ब्रिजभूषण सिंह यांची भूमिका

जोपर्यंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी भूमिका भाजपचे उत्तर प्रदेशमधील खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली आहे. राज ठाकरे यांनी सुरुवातीला उत्तर भारतीयांविरुद्ध घेतलेल्या भूमिकेमुळे ब्रिजभूषण सिंह नाराज आहेत. राज यांनी उत्तर भारतीयांविरुद्ध महाराष्ट्रात छेडलेल्या आंदोलनांमुळे उत्तर भारतीयांचा फार मोठा अपमान झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा 5 जून रोजी प्रस्थापित आहे.

(हेही वाचाः बाकीचे पक्ष राज ठाकरेंचा गेम करत आहेत, शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचे मत)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here