‘मी शेट्टी नाव लावून घ्यायला तयार, त्यामुळे तरी…’, फडणवीसांच्या मिश्कील विधानाने पिकला हशा

130

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभागृहातील आणि सभेतील भाषणांचं कायमंच कौतुक करण्यात येतं. सभागृहात माहितीपूर्ण भाषण आणि जाहीर सभेत लोकांची मनं जिंकून घेणारे भाषण फडणवीस करतात. रविवारी बंटारा समाजाच्या कार्यक्रमातही फडणवीसांच्या भाषणात त्यांनी केलेल्या एका विधानाने सभागृहातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या कार्यक्रमात निवेदकांनी फडणवीस यांचा उल्लेख देवेंद्रे शेट्टी फडणवीस असा करण्यात आला. त्यानंतर फडणवीस यांनी मिश्कील टिप्पणी केली. मी माझं अडनाव शेट्टी करायला तयार आहे. त्यामुळे माझ्या नावावर नक्कीच दोन-चार हॉटेलं होतील, असे फडणवीस यांनी म्हटले. त्यांच्या या विधानामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

(हेही वाचाः ‘उद्धव ठाकरेंनी मला फोन करावा मी त्यांना सांगतो…’,काय म्हणाले नारायण राणे?)

मी शेट्टी नाव लावून घ्यायला तयार…

मी अनेकदा बंटारा समाजाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत असल्याने निवेदन करताना जय अण्णा यांनी माझे नाव देवेंद्र शेट्टी फडणवीस असल्यासारखे वाटत असल्याचे म्हटले. मी तर आनंदाने शेट्टी अडनाव लावायला तयार आहे. कारण शेट्टी अडनाव लावल्यामुळे दोन-चार तरी हॉटेल माझ्या नावावर होतील, असे मिश्कील विधान फडणवीसांनी केले. त्यानंतर मात्र सभागृहातील उपस्थित सर्वांनी टाळ्या आणि शिट्या वाजवल्या आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ सुरू झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.