त्यांना जमलं नाही तर आम्ही ‘पुन्हा येणार’ आहोत… आता फडणवीसांची भविष्यवाणी

माथाडी कामारांसाठी नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या एका मेळाव्यात ते बोलत होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मतदानात पहिल्या क्रमांकावर असणा-या भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. त्यामुळे त्यानंतर भाजपाच्या नेत्यांकडून हे सरकार पाडण्याची विधानं वारंवार होत असतात. अनेक भाजपा नेत्यांनी तर सरकार लवकरच पडेल अशी भविष्यवाणी सुद्धा केली आहे.

त्यातच आता खुद्द माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतीत एक मोठं विधान केलं आहे. माथाडी कामारांसाठी नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या एका मेळाव्यात ते बोलत होते.

(हेही वाचाः पदांच्या भरतीसाठी सुरू आहे ‘दलाली’! फडणवीसांचा गंभीर आरोप)

काय म्हणाले फडणवीस?

माथाडी कामगारांच्या समस्या दूर करण्यासाठी आमच्या सरकारची दरवाजे कायमंच उघडी होती. माथाडी कामगार चळवळीतील नेत्यांनी कधीही आपले प्रश्न मांडले की ते सोडवायचो. पुढचाही काळ मिळाला तर उरलेले प्रश्न देखील सोडवले असते, असं फडणवीस म्हणाले.

आताच्या सरकारला माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्याची पूर्ण संधी आहे. ते सुद्धा हे प्रश्न नक्कीच सोडवतील असा मला विश्वास आहे. आणि जर त्यांना हे जमलं नाही तर आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. तेव्हा आम्ही तुमचे प्रश्न नक्कीच सोडवू, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

(हेही वाचाः राज्य सरकारचे ‘मिशन अनलॉक’: आता थिएटर्सचे दरवाजेही उघडणार)

लोकशाहीत हे होतंच असते, पण…

लोकशाही देशांत कायमंच कमी-अधिक होत असते. कधी एक पक्ष असतो तर कधी दुसरा. पण कामगारांचे प्रश्न हे कुठल्याही पक्षाच्या पलीकडचे आहेत. त्यामुळे ते सोडवण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे, असेही फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here