राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद विकोपाला गेले आहेत. सत्तेतील शिवसेना आणि भाजप एकमेकांवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सातत्याने आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात आपलं हिंदुत्व हे गदाधारी असल्याचं सांगत भाजपला टोला लगावला. त्याला आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सकाळी टीव्ही लावल्यानंतर तुम्ही गधाधारी आहात हे लक्षात येतं, अशा शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला.
(हेही वाचाः जेलमधून बाहेर येताच सदावर्तेंचं अमित शहांना साकडं)
काहींना हिंदू असल्याची लाज वाटते
आपण अनेक वेळा बघितलं की काही लोकांना हिंदू असल्याची लाज वाटते. आता तर घंटाधारी आणि गदाधारी हे नवीन हिंदुत्व आलं आहे. पण तुम्ही गदाधारी आहात की नाही माहीत नाही, पण रोज सकाळी टीव्ही पाहिल्यानंतर तुम्ही गधाधारी नक्की आहात हे आमच्या लक्षात येतं, असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेचा समाचार घेतला.
(हेही वाचाः काँग्रेसला शिवसेना संपवतेय का? काँग्रेसच्या नेत्यांना का वाटतंय असं)
काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे. रामदास स्वामींनी लिहून ठेवलेल्या मारुती स्त्रोतातील भीमरुप आणि महारुद्र काय असतं ते शिवसेनेच्या अंगावर आल्यावर आम्ही दाखवायला कमी करणार नाही. हनुमान चालिसा जर आमच्या घरी येऊन म्हणायची असेल तर म्हणू शकतात, पण त्याला एक पद्धत असते. आमच्या घरी दिवाळी असो नसो साधुसंत येत असतात. पण तुम्ही जर दादागिरी करुन याल, तर ती कशी मोडायची हे देखील शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हिंदुत्वाच्या भाषेत शिकवलं आहे.
Join Our WhatsApp Community