Devendra Fadnavis: मोदींबद्दल बोलणे म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जीवनात एक तरी विकासकाम केलेले आहे का? ते मला दाखवा.

137
Devendra Fadnavis: मोदींबद्दल बोलणे म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्याची आम्हाला गरज नाही; कारण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास पाहत आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेले विकासाचे एक काम तरी सांगावे. संपूर्ण जीवनात उद्धव ठाकरे यांनी एक तरी विकासकाम केलेले दाखवावे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी मोदींबद्दल बोलणे म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात सभा होत आहे. महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सभा घेत आहेत. यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील सोलापुरात दाखल झाले आहेत. सोलापुरात दाखल होताच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जीवनात एक तरी विकासकाम केलेले आहे का? ते मला दाखवा. अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी होते. मात्र, त्यांनी विकासाचे कुठलाच काम केले नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. संजय राऊत ही व्यक्ती कोण आहे? ते मला माहिती नाही; पण ठाकरेंनी मी म्हणजेच महाराष्ट्र आहे, या माणसिकतेतून बाहेर यायला हवे, अशी टीका त्यांनी केली आहे.

(हेही वाचा – Babar Azam Record : बाबर आझम बनला टी-२० च्या इतिहासातील सर्वाधिक चौकार ठोकणारा फलंदाज  )

राम राम भारतात नाही, तर पाकिस्तानात करायचे का?
भारतीय जनता पक्ष धार्मिक प्रचारात गुंतला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या वतीने करण्यात आला होता. त्यांना आजही राम नाव वापरावे लागत असल्याचे ते म्हणाले होते. यालादेखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही राम-राम करतो याचा शिवसेनेला इतका राग का येतो? भारतामध्ये राम राम नाही म्हणायचे तर पाकिस्तानात म्हणायचे का? असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. आम्ही राम राम म्हणणारच, असेदेखील फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.