वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटले आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील तब्बल १ लाख नोकऱ्या बुडाल्या, असा आरोपही विरोधकांकडून करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दरम्यान वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी वेदांता-फॉक्सकॉनच संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांताचे आभार मानत विरोधकांना टोला लगावला आहे.
वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू. https://t.co/2X0oGP2ujX— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2022
(हेही वाचा – नाशिकच्या पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर दोन महिलांध्ये तुफान राडा, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल)
वेदांता-फॉक्सकॉन कंपनीची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती. मात्र ती गुजरातमध्ये करणार असल्याचे जाहीर झाले. त्यानंतर शिवसेना नेत्यांकडून राज्य सरकारला लक्ष्य केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी ट्वीट करून सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले फडणवीस
महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यासह ते असेही म्हणाले की, मात्र मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
पुढे ते असेही म्हणाले की, वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी अनिल अग्रवाल यांचे मनःपूर्वक आभार मानतो. माझा या नेत्यांना प्रश्न आहे की, महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला? स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत कर ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
Join Our WhatsApp Community