राम वर्गणीची चेष्टा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने केली. राम वर्गणीच्या विषयावर कुचेष्टा करणारे लेख त्यांच्या वर्तमानपत्राने लिहिले. राम मंदिर बांधायला सुरुवात होताना जागेसंबंधी ज्यांनी वादविवाद केले अशा व्यक्तीची तळी उचलणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा राम मंदिराशी संबंधच काय? असा सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील ‘बाबरी पाडली तेव्हा शिवसेनेचं कोणीही नव्हतं’ असं विधान केलं आहे.
(हेही वाचा – Eknath Shinde: मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू करावी, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली इच्छा)
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
“डॉ. फडणवीस (Devendra Fadnavis) वगैरे लोक पिचक्या मांडीवर थाप मारून सांगत आहेत. राममंदिराच्या लढ्यात शिवसेनेचे योगदान काय? हिंमत असेल तर अयोध्येत या, तुमच्या छाताडावर मंदिर उभे केले आहे”, अशी टीका २७ डिसेंबरच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखातून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
भारत पुन्हा राममय होतो आहे…
आनंद उत्साहाचे वातावरण आहे..(अखंड हरिनाम सप्ताह व भव्य रामायण कथा कार्यक्रम | बदनापूर, जालना)@KucheMla @save_atul @raosahebdanve#Maharashtra #Jalna #Ram #ramayan #ramkatha pic.twitter.com/EHXVNzfN5K
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 30, 2023
(हेही वाचा – Israel Hamas War : इस्रायलला शस्त्रविक्रीस बायडेन यांची मंजुरी; २४ तासांत १६५ पॅलेस्टिनी ठार)
शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की; “बाबरी मशीद पाडल्यानंतर बाळासाहेबांनी एक विधान केलं होतं. त्यामुळे आता कोणीही बाबरी पाडण्याचे श्रेय घेत आहे. असं असलं तरीही शिवसेनेचे कोणतेही नेते त्याठिकाणी उपस्थित नव्हते.”
केंद्रीय कारागृहात मी १७ ते १८ दिवस काढले – देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी झी २४ तासशी बोलत असताना बाबरी मशीद पाडण्याच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले की; “अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा राम शीला पूजन झाले, तेव्हा मी केवळ १८ वर्षांचा होतो. पहिल्या कारसेवेच्या वेळी मी स्वतः गेलो होतो. अयोध्येतून रामजन्मभूमीच्या ठिकाणी पायी चालत जात असताना आमच्यावर लाठीचार्ज झाला. बदायू येथील केंद्रीय कारागृहात मी १७ ते १८ दिवस काढले. त्यानंतर १९९२ साली मी पुन्हा अयोध्येत गेलो होतो. बाबरीचा ढाचा पाडला, तेव्हाचा आनंद वेगळाच होता. तो शब्दात सांगता येणार नाही. अटलजींच्या काळातही पुन्हा कारसेवा झाली, तेव्हाही आम्ही गेलो होतो, अशीही आठवण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community