मागील अनेक दिवसांपासून भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर कुणाची निवड होणार यावर जोरदार चर्चा सुरू आहे. कालपर्यंत विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र चर्चेत असलेली सर्व नावे बाजूला ठेवून पक्षाच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची निवड करण्याचा निर्णय पक्ष श्रेष्ठींनी घेतला असल्याचे समजते. दरम्यान याच पार्श्वभूमीवर भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलतांना विधान केले. (Chandrakant Patil)
(हेही वाचा – Best Engineering Colleges In Pune : पुण्यात अभियांत्रिकी शिक्षणासाठी जाणार आहात, तर ‘या’ महाविद्यालयांबद्दल नक्की वाचा)
चंद्रकांत पाटील म्हणाले की,… तर आम्हाला आनंदच
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करण्यात आल्याने त्यांच्या जागी नव्या अध्यक्षांची नेमणूक होणार आहे. दरम्यान, पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणतात की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर आम्हा सर्वांना आनंद आहे. त्यांच्यात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे गुण आहेत अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. याबाबतच पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलतांना चंद्रकांत पाटील यांनी विधान केले आहे. (Chandrakant Patil)
(हेही वाचा – Paris Olympic 2024 : मुष्टियुद्धात लवलिना, निशांतची अंतिम ८ जणांमध्ये धडक)
उद्धव ठाकरे त्रागा करतात
पुढे पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, ”उद्धव ठाकरे अलिकडच्या काळात जास्त त्रागा व्यक्त करतात. माणसांनी तेच बोलावं पण व्यवस्थित बोलावं. नीट बोलल्यावर ऐकणाऱ्याला लाख मोलाचे बोलला असे वाटते. उद्धव ठाकरे जे बोलले त्याची प्रतिक्रिया सामान्य माणसातून येणार आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये फडणवीसांबद्दल प्रेम आहे. अशा प्रकारचा त्रागा पूर्वी ठाकरे करत होते. जनतेने किती वेळा तेच तेच मुद्दे ऐककयचे” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. (Chandrakant Patil)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community