Devendra Fadnavis : मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की….

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.

113
CM Devendra Fadnavis यांच्या शपथविधीनंतर विशेष अधिवेशनाची घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर गुरुवार, ०५ डिसेंबर रोजी आझाद मैदान येथे मोठ्या उत्साहात महायुतीचा सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. या वेळी देवेंद्र (Devendra Fadnavis)  फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित हा दिमाखदार सोहळा झाला.

eknath shinde 13

राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने या सोहळ्याची सुरुवात झाली. जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस उभे राहिले तेव्हा एकच जल्लोष झाला. त्यानंतर दुसरी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

ajit pawar 13

‘हे; केंद्रीयमंत्री होते उपस्थित 

केंद्रीयमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराज सिंग चौहान, निर्मला सीतारामन, रामदास आठवले, चिराग पासवान, मुरलीधर मोहोळ, पियुष गोयल, ज्योतिरादित्य शिंदे, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, एडी कुमारस्वामी.

(हेही वाचा CM Devendra Fadnavis : मुंबईत घर नाही, एकही कार नावावर नाही असा मुख्यमंत्री.. किती आहे संपत्ती ?)

हे मान्यवर होते उपस्थित 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, रवी राणा, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार.

‘हे’ मुख्यमंत्री होते उपस्थित 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हिमंत बिस्वा सरमा, नितीश कुमार, प्रमोद सावंत, चंद्राबाबू नायडू, मोहन यादव.

उद्योगपतींची हजेरी  

गौतम अदानी, मुकेश अंबानी, अनिल अंबानी

कलाकारांचीही हजेरी 

सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, सलमान खान, माधुरी दीक्षित, रणवीर कपूर, रणवीर सिंग, संजय दत्त.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.