शिंदे गटातील खासदारांना २०२४ मध्ये निवडून आणण्याची जबाबदारी फडणवीसांनी घेतली

94

उद्धव ठाकरे यांना सोडून १२ खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. त्या खासदारांना २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले

भाजप नेते, राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आणि शिवसेना -भाजप युतीसंदर्भात महत्वाचे विधान केले. भाजपाने गेल्या सहा महिन्यांपासून 16 मतदारसंघामध्ये विशेष तयारी सुरु केली आहे. लोकसभेची पुढची निवडणूक आम्ही शिवसेना भाजप युतीत लढणार आहोत. जे आमच्यासोबत आहेत त्यांना निवडून आण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. तसेच आमचा पक्ष जरी आम्ही मजबूत केला, तरीही ती संपूर्ण शक्ती आम्ही शिवसेनेचे जे खासदार आमच्या सोबत आहेत. त्यांनाही निवडून आणण्यासाठी खर्ची घालणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा आमिर खानच्या Lal Singh Chaddha चित्रपटावर बंदीची मागणी! का सुरु आहे #BoycottLaalSinghChaddha ट्विटर ट्रेंड?)

मंत्रिमडळ विस्ताराला न्यायालयाचा विरोध नाही 

सर्वोच्च न्यायालयाने मंत्रिमंडळाचा विस्तार करु नका, असे कुठेही म्हटलेले नाही. न्यायालयातील सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबध नाही. म्हणूनच आपण सांगिले, की आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत आणि तुम्ही लोक विचार करत आहात त्याच्याही आधी आम्ही करू, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी चर्चा अनेकजण करत आहेत, असे विचारले असता, यावर, कोण काय म्हणत आहे, याला काहीही अर्थ नाही. यावर उत्तर द्यायला मी काही रिकामा नाही. राजकारणात परिस्थिती काय आहे, याला महत्व असते, असे फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.