महाराष्ट्रातील घटना व्यथित करणाऱ्या, फडणवीसांना असे का वाटते?

119

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा दाम्पत्याला अटक करण्यात आल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील चार घटनांचा उल्लेख करत महाराष्ट्रातील या घटना व्यथित करणाऱ्या आहेत, अशी प्रतिक्रिया ट्विटरद्वारे दिली आहे.

फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये हनुमान चालिसा पठणाला राणा दाम्पत्य येतात तर अटक होते. महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा होते, पण त्याची साधी दखलही घेतली जात नाही. मोहित भारतीय यांच्यावर हल्ला होतो, पण याचाही साधा गुन्हा दाखल होत नाही. भाजपच्या पोलखोल रथावर हल्ले होतात, पण आरोपी अटकेत नाही अशाप्रकारच्या चार घटनांचा उल्लेख त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे.

राणांच्या व्हिडिओनंतर ट्वीट

नवनीत राणा यांनी घरातून एक व्हिडिओ व्हायरल करत देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आपल्या सारखे नेते महाराष्ट्रात असताना असे अन्याय कसे होतात असा सवाल केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर ही प्रतिक्रिया देत चिंता व्यक्त केली.

फडणवीसांचे सवाल

त्याआधी त्यांनी ट्विटवर इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारच करणार हिंसाचार, एवढी तुमची मर्दुमकी? सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण, जनता सारे काही पाहते आहे! निव्वळ लज्जास्पद असे म्हणत त्यांनी लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला? लोकशाहीचे गाऱ्हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का, असाही सवाल फडणवीस यांनी ट्विटवर केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.