विकासाला विरोध करणे हा उद्धव ठाकरेंचा स्वभावच असल्याची टीका (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. धारावी पुनर्वसनावरून उद्धव ठकरेंनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना फडणवीस बोलत होते.
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सोमवारी (११ डिसेंबर) उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाला हजेरी लावली होती. यावेळी धारावी पुनर्वसनावरून ते म्हणाले की, धारावी पुनर्वसना करताना टीडीआरची सक्ती नको. आम्ही संपूर्ण मुंबई अदानी-अंबानींच्या घशात घालू देणार नाही. टीडीआर बँक बनवायची असेल तर त्याची मालकी सरकारकडे असायला हवी. आमच्या काळात टेंडर निघालेले नाही हे जगजाहीर आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
(हेही वाचा – Indigo: इंडिगो प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना फटका, उड्डाण घेण्यापूर्वीच विमानाचे पार्किंग ब्रेक जाम)
उद्धव ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देताना (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “धारावीचे पहिले टेंडर अदानी यांना देण्यात आलेले नव्हते. ते टेंडर रद्द करण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केले. आता जे टेंडर आहे, त्याचे नियम आणि अटी ठरवण्याचे काम कोणी केले, तेही उद्धव ठाकरे सरकारने केले. विकासाच्या कामांना नेहमीच विरोध करायचा हेच उद्धव ठाकरेंचे धोरण असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंचा मूळ स्वभाव विकासाला विरोध करणे हाच आहे
धारावीतील लोकांना घरे मिळू नये, अशीच ठाकरेंची नीती आहे. धारावीतील लोकांना घरे मिळाली, तर ते आमच्या पाठिशी येणार नाहीत, यांना झुंझवत ठेवा, अशा प्रकारची नीती त्यांची दिसते. त्यानुसारच त्यांचे काम चालले आहे, या शब्दांत (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच पहिल्यांदा जी रिफायनरी होती, त्याला विरोध केला. मग उद्धव ठाकरेंनीच त्यांचे सरकार असताना पत्र पाठवले की, या ठिकाणी नको तर त्या ठिकाणी रिफायनरी करा. मग तिथे रिफायनरी करायला घेतली तर स्वतःच तिथे विरोध करायला गेले. त्यामुळे त्यांचा मूळ स्वभाव विकासाला विरोध करायचा आहे. विकासाला विरोध आहे, त्या व्यक्तीशी काय बोलायचे, असा सवाल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.
(हेही वाचा – Rajanikanth : एक मराठी माणूस झाला तामिळनाडूचा थलैवा; सुपरस्टार रजनीकांत यांचा वाढदिवस)
दरम्यान, उद्धव ठाकरे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजात सहभागी झाले. यावर बोलताना (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे नागपूरला अधिवेशनाला आले. आता ते किती दिवस आले, याचा हिशोब तुम्ही करा. पण ते आले, ते काय कमी आहे का, प्रत्यक्ष येऊन बसले हे कमी आहे का, त्यावर फार बोलणार नाही असे फडणवीस यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community