‘जाहीर माफी मागा, नाहीतर…’,अमृता फडणवीसांची मलिकांना कायदेशीर नोटीस

108

राज्यात सध्या नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस हे आमने-सामने असून त्यांचा सामना सुरू असून पत्रकार परिषदांच्या मार्फत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसताय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांवर आरोपांची मालिका सुरु केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानेच मुंबईत ड्रग्सचा काळा धंदा सुरु झाल्याचा आरोप मलिकांनी केला. त्यानंतर मलिकांनी फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेला जयदीप राणाचा एक फोटो पोस्ट केला होता. हा जयदीप राणा ड्रग्स पेडलर असल्याचेही मलिक यांनी म्हटले होते. त्यावरुन आता अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, मलिक यांनी एक फोटो ट्वीट केला होता. त्यामध्ये अमृता फडणवीस आणि जयदीप राणा पाहायला मिळत होते. जयदीप राणा हा ड्रग्स पेडलर आहे. अमृता फडणवीस यांनी मुंबईतील नद्यांच्या संवर्धनासंदर्भात गायलेल्या गाण्याचे फायनान्स जयदीप राणा याने केले होते, असा दावा मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

(हेही वाचा – महाराष्ट्रात दत्तक घेणाऱ्या बालकांमध्ये सर्वाधिक ‘कन्या’!)

अन् दिला अमृता फडणवीसांनी मलिकांना इशारा

मलिकांनी केलेल्या आरोपांनतर अमृता फडणवीस आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणी त्यांनी नवाब मलिकांना कायदेशीररित्या नोटीस पाठवली आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून मलिकांवर निशाणा साधत त्यांना इशारा दिला आहे. पुढील ४८ तासांत मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलीट करा आणि जाहीरपणे माफी मागा, नाहीतर मानहानीच्या खटल्याकरता सामोरे जा….

असे केले ट्विट

‘नवाब मलिक यांनी काही फोटोंसह बदनामीकारक, दिशाभूल करणारे, अपमानास्पद ट्विट केले आहेत. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली फौजदारी कारवाईसह बदनामीची नोटीस देत आहे. मलिक यांनी बिनशर्त सार्वजनिक माफी मागून ४८ तासांत ट्विट हटवावेत किंवा कारवाईला सामोरं जावं’, असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी नोटीसचे काही फोटोही शेअर केले आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.