पोलीस अधिकारी देवेन भारती यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रवीणसिंह परदेशीही महाराष्ट्रात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यांना महाराष्ट्र इन्स्टिट्युशनल ट्रान्सफॉर्मेशन अर्थात ‘मित्र’ या संस्थेची जबाबदारी दिली जाणार असल्याचे कळते.
राज्यात सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस सरकारने नीती आयोगाच्या धर्तीवर ‘मित्र’ या संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या उपाध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, तसेच ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजय आशर आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची नेमणूक करण्यात आली. हे दोघेही शिंदे गटाशी संबंधित आहेत. भाजपचा कोणताही प्रतिनिधी अद्याप मित्रवर नेमला गेलेला नाही.
(हेही वाचा गिरीश महाजनांनी सांगितली एकनाथ शिंदेंच्या बंडाची कहाणी; म्हणाले…)
काय आहे नेमणुकीमागील कारण?
मात्र, एखादा आमदार किंवा कार्यकर्ता नेमून जागा व्यापण्यापेक्षा थेट एखाद्या विश्वासू सनदी अधिकाऱ्याच्या हाती ‘मित्र’ संस्थेची सूत्रे देऊन अंतर्बाह्य कारभारावर नजर ठेवता येईल, असे देवेंद्र फडणवीस यांचे मत आहे. त्यामुळे प्रवीणसिंह परदेशी यांची ‘मित्र’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Join Our WhatsApp Community