Chief minister म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणारे Devendra Fadnavis तिसरे!

66
Chief minister म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणारे Devendra Fadnavis तिसरे!
  • सुजित महामुलकर

गुरुवारी ५ डिसेंबर २०२४ या दिवशी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी घोषणा झाली आणि राज्यात तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे फडणवीस हे तिसरे मुख्यमंत्री असतील, हे आता स्पष्ट झाले आहे.

(हेही वाचा – मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद आमच्यासाठी तांत्रिक व्यवस्था; Devendra Fadnavis यांनी मांडली भूमिका)

पवार एकमेव

महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत २० मुख्यमंत्री जनतेने पाहिले. फडणवीस (Devendra Fadnavis) हे २१ वे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी ५ डिसेंबरला शपथ घेतील. शरद पवार हे एकमेव राजकीय नेते आहेत ज्यांनी चार वेळा राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तसेच वसंतराव नाईक यांनीही यापूर्वी तीन वेळा राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली आहे. विशेष म्हणजे नाईक यांनी सलग तीन टर्ममध्ये तीन वेळा मुख्यमंत्री पद सांभाळले असून मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ ११ वर्षे ७८ दिवस राहणारे नाईक हे एकमेव मुख्यमंत्री आहेत.

(हेही वाचा – Ajit Pawar : एकनाथ शिंदे – अजित पवारांमध्ये हास्यविनोद; दादांना सकाळ-संध्याकाळ शपथ घेण्याचा अनुभव…)

पाच वर्षे पूर्ण करणारे फडणवीस दुसरे

तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे पवार, नाईक यांच्यानंतर फडणवीस (Devendra Fadnavis) हे तिसरे मुख्यमंत्री असतील. फडणवीस यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नाईक यांच्यानंतर पाच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे दुसरे मुख्यमंत्री आहेत. २०१४ ते २०१९ अशी पाच वर्षे फडणवीस मुख्यमंत्री राहिले असून फडणवीस हे भाजपाचे पहिले नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सांभाळले.

(हेही वाचा – Cabinet Oath Ceremony कडक पोलीस बंदोबस्तात; कर्नल तुषार जोशींनी घेतला सुरक्षेचा आढावा)

मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्रीही

फडणवीस यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या पाच वर्षात फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता आणि उपमुख्यमंत्री अशा तीनही वैधानिक पदांवर काम केले आहे. मुख्यमंत्रीपदी अगदी काही तासच काम केले असले तरी तांत्रिकदृष्ट्या ते मुख्यमंत्री असल्याची नोंद इतिहासात झाली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.