Devendra Fadnavis : दिल्लीच्या राजकारणात जाणार कि महाराष्ट्रात ? म्हणाले, सांगता येत नाही…

117
Devendra Fadnavis : दिल्लीच्या राजकारणात जाणार कि महाराष्ट्रात ? म्हणाले, सांगता येत नाही...
Devendra Fadnavis : दिल्लीच्या राजकारणात जाणार कि महाराष्ट्रात ? म्हणाले, सांगता येत नाही...

भाजपच्या (BJP) राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नावाविषयी चर्चा चालू आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत या नावाची चर्चा जोरदार चालू आहे. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारण सक्रिय केले जाईल, असेही बोलले जात आहे. मात्र महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक असल्याने याबाबत काही महिने वाट पहावी लागणार आहे. त्यासाठीही नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागण्याची शक्यता आहे. असे असले, तरीही गुरुवारी देवेंद्र फडणवीसांच्या संभाव्य नियुक्तीबाबत दिल्लीत जोरदार चर्चा सुरू होती. गुरुवार, १ ऑगस्टच्या संध्याकाळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील आगामी रणनितीवर आणि दिल्लीला जाण्यावर भाष्य केले.

(हेही वाचा – Ind vs SL, 1st ODI Preview : पहिल्या एकदिवसीय सामन्यात सगळ्यांच्या नजरा पुनरागमन करणाऱ्या रोहित आणि विराटवर )

दिल्लीत जाण्याच्या चर्चांविषयी विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी एक शब्दात उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राजकारण हा अनिश्चितेतचा निश्चित खेळ आहे. त्यामुळे उद्या काय घडेल, हे राजकारणात कधीही सांगता येत नाही. मात्र तुम्ही हा प्रश्न ज्या अनुषंगाने विचारलात, त्यांचे उत्तर मी एकाच वाक्यात देईन मी इथेच आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातली कटुता कशी दूर होईल ?

महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता निर्माण झाली आहे, ती कशी दूर होईल ?, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) म्हणाले, तुम्ही माध्यमे यासाठी जबाबदार आहात. रोज सकाळी नऊ वाजता एक चेहरा तुम्ही दाखवता. तिथून सगळी कटुता सुरु होते. त्यानंतर मग दिवसभर तेच सुरु राहते. तुम्ही तो चेहरा दाखवणे बंद करा. आठ दिवसांत महाराष्ट्रातल्या राजकारणातली कटुता दूर होईल, असे उत्तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले. संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांनी ही टीका केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.