Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे शपथविधीपूर्वी देव दर्शन आणि गो दर्शन!

180
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे शपथविधीपूर्वी देव दर्शन आणि गो दर्शन!
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे शपथविधीपूर्वी देव दर्शन आणि गो दर्शन!

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज (५ डिसेंबर) मुख्यमंत्रिपदाची शपथ (Maharashtra CM Oath Ceremony) घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधी सोहळा होईल. तर आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असून तर बाकीचे मंत्री अधिवेशनाआधी शपथ घेतील, अशी माहिती आहे. (Devendra Fadnavis)

फडणवीसांचे शपथविधीपूर्वी देव दर्शन आणि गो दर्शन

मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेण्याआधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सिद्धिविनायक आणि मुंबादेवीच्या दर्शनाला पोहचले. शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत देवदर्शन केलं. देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायक आणि मुंबादेवीच्या चरणी लीन झाले. यानंतर सागर बंगल्यावर आल्यावर देवेंद्र फडणवीसांनी गोमातेचं पूजन केलं. बळीराजाचं राज्य यावं म्हणून ही पूजा करण्यात आली आहे. गीर आणि खिल्लार प्रजातीची गाय आण्यायात आली होती.

महंत सुधीरदास महाराज काय म्हणाले?
आम्ही सर्व साधू महंत आणि महाराज यांनी काढून दिलेल्या मुहूर्तावरच आजचा शपथविधी होत आहे. आजच्या शुभ मुहूर्तावर हा शपथविधी होत असल्याने हे सरकार निर्विघ्नपणे पाच वर्षाचा त्यांचा कार्यकाल पूर्ण करेल. आजच्या शपथविधी आम्ही 300 साधू महंत व्यासपीठावर असणारा आहोत. आमच्या नवीन सरकारसाठी शुभेच्छा आहेत. आज तीनच लोकांनी शपथ घेतली तरी त्याचा काहीही फरक या सरकारवर पडणार नाही, असं महंत सुधीरदास महाराज यांनी सांगितले. (Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.