ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घेण्याचे वक्तव्य केले आहे, हे खरोखरीच खेदजनक आहे. ते लढवय्ये नेते आहे, त्यांना आम्ही राजकीय संन्यास घेऊ देणार नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले.
फडणवीसांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल!
आधीच राज्यात आणि देशात राजकीय नेतृत्वाचा तुटवडा आहे. राजकीय विश्वासाला नव्या नेतृत्वाची गरज असताना फडणवीस यांच्यासारखे जर राजकीय नेतुत्व संन्यास घेण्याच्या भाषा करत असतील, तर हे राजकीय विश्वाचे नुकसान आहे. हा भाजप आणि महाराष्ट्रावर अन्याय होण्यासारखे होईल. फडणवीस यांनी अशी फकीर होण्याची भाषा करू नये, हे योग्य नाही. त्यांच्या सहकार्यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करावा, वाटल्यास मी स्वतः त्यांना भेटून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करेन. फडणवीस यांनी चिंता करू नये, त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे, असेही राऊत म्हणाले.
(हेही वाचा : दोन दिवसांचे अधिवेशन कोरोनासाठी की बचावासाठी?)
युतीच्या काळात भांडी फुटत होती!
महाविकास आघाडी सरकार हे किमान सामान कार्यक्रमावर चालत आहे. या सरकारचे उत्तम चालले आहे. तीन पक्ष एकत्र आल्याने भांड्याला भांडे लागणारच, याआधी शिवसेना – भाजप युतीचे सरकार होते, तेव्हा तर भांडी फुटत होती, पण तरीही ५ वर्ष सरकार चालले ना, तसेच हे सरकारही चालेले, असेही राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community