Lok Sabha Election 2024 : माढ्याची सुभेदारी अखेर मोहिते पाटलांकडे?

र्यशील मोहिते पाटील यांनी मागील काही वर्षांपासून माढा मतदार संघामध्ये तयारी करण्यास सुरुवात केली होती.

215
माढा लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे कोण उमेदवार असणार?, मोहिते-पाटील बंड करणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता मिळू लागली असून मोहिते-पाटील परिवार राष्ट्रवादीत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाल्याची चर्चा आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. पक्षप्रवेश आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांना माढ्यातून उमेदवारी मिळणार असल्याचीही चर्चा आहे.

समर्थकांमध्ये तुतारी हातात घ्यावी असा सूर

धैर्यशील मोहिते पाटील यांनी मागील काही वर्षांपासून माढा मतदार संघामध्ये तयारी करण्यास सुरुवात केली होती. त्यासंदर्भात त्यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न देखील केले होते. परंतु भाजपाने या ठिकाणी विद्यमान खासदार रणजीतसिंग नाईक-निंबाळकर यांच्या पदरातच उमेदवारी टाकल्याने मोहिते पाटील नाराज होऊन त्यांच्या समर्थकांमध्ये तुतारी हातात घ्यावी असा सूर आळवण्यास सुरुवात केली होती. यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचे निशान फडकवले. त्यानंतर धैर्यशील आणि मोहिते-पाटील परिवारातील सर्व सदस्यांनी माढा लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. (Lok Sabha Election 2024)

महादेव जानकर यांचे नाव होते चर्चेत 

याच कारणाने मागील काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेऊन देखील शरद पवार यांनी या ठिकाणी कोणालाही उमेदवारी घोषित केलेली नव्हती. सुरुवातीला महादेव जानकर यांना आपल्याबरोबर महाविकास आघाडीमध्ये घेऊन माढ्याची उमेदवारी देण्याच्या गोष्टी देखील समोर आल्या होत्या, परंतु नंतर महादेव जानकर यांनी महायुतीमध्ये जाऊन परभणी लोकसभा मतदारसंघ लढवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर या मतदार संघासाठी पुन्हा एकदा उमेदवाराची चाचपणी सुरू झाली. त्यातच मोहिते पाटील नाराज असल्याने ही उमेदवारी अजूनही जाहीर झालेली नव्हती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार, 11 एप्रिल रोजीच मोहिते पाटील हे शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या राष्ट्रवादी गटामध्ये सामील होत येथील उमेदवारी आपल्या पदरात घेणार आहेत. (Lok Sabha Election 2024)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.