माढा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार, याविषयी बरीच चर्चा झाल्यानंतर आता धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. भाजपाने रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील कुटुंबियांमध्ये नाराजी होती. त्यामुळे भाजप उमेदवार बदलणार कि मोहिते पाटील पक्ष बदलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
(हेही वाचा – उद्धव ठाकरेंचे नेते राहुल गांधी, आमचे नेते PM Modi; मतदारांनी ठरवावे कुणाला मत द्यायचे? फडणवीसांचे आवाहन)
धैर्यशील मोहिते विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाने धैर्यशील मोहिते विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर अशी लढत माढा लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election 2024) पहायला मिळणार आहे. रणजितसिंह निंबाकर यांना भाजपने तिकीट दिल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज होते. ते भाजपाकडून माढा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. भाजपाने पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे मोहिते पाटील आता शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
16 एप्रिलला करणार शक्तिप्रदर्शन
धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे 16 एप्रिलला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ते त्याच दिवशी म्हणजे 16 एप्रिलला पक्ष प्रवेशासह शक्तिप्रदर्शन आणि सोलापुरात (solapur)अर्ज उमेदवारी दाखल करणार आहेत. धैर्यशील हे माढा लोकसभा मतदारसंघातून (madha loksabha election) भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Nimbalkar) यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातून मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी रणजितसिंह निंबाळकरांना मोठा एक लाख मताहून अधिकचा लीड दिला होता. मधल्या काळात मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्या खटके उडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नंतरच्या काळात मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यातील अंतर वाढले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community