भाजपाकडून राज्यसभेकरता Dhairyasheel Patil यांना, तर अजित पवार गटाकडून नितीन पाटलांना उमेदवारी घोषित

भाजपाचे नेते पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले यांची लोकसभेवर निवड झाल्याने या दोन जागा रिक्त झालेल्या आहेत.

145

भाजपाने राज्यसभेसाठी नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात आसामधून मिशनरंजन दास, रामेश्वर तेली. बिहारमधून मनन कुमार मिश्र, हरियाणामधून किरण चौधरी, मध्य प्रदेशमधून जॉर्ज कुरियन, महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील (Dhairyasheel Patil), ओडिसा येथून ममता मेहंता, राजस्थानमधून सरदार रवनीत सिंह बिट्टू, त्रिपुरा येथून राजीब भट्टाचार्जी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक झाल्यानंतर या दोन जागांवर कोण लढणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तर अजित पवार गटाकडून नितीन पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

भाजपाचे नेते पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले यांची लोकसभेवर निवड झाल्याने या दोन जागा रिक्त झालेल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांवर भाजपा आपले उमेदवार देणार की त्यापैकी एक जागा मित्रपक्षाला देणार, याबाबत चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता भाजपाने यादी जाहीर करत एकाच जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. राज्यसभेसाठी भाजपाकडून अनेकांची नावांची चर्चा होती. पण, रायगडच्या धैर्यशील पाटलांच्या (Dhairyasheel Patil) नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

(हेही वाचा Badlapur School Case : अखेर सहा तासांनी बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलकांना लाठीचार्ज करून पांगवले)

दरम्यान, महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्यांमध्ये रिक्त असलेल्या राज्यसभेच्या १२ जागांसाठी येत्या ३ सप्टेंबर रोजी निवडणुका होणार आहेत. तसेच त्याच दिवशी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. यात महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या दोन जागांचा समावेश आहे. सातारच्या बदल्यात उदयनराजे भोसले यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेची जागा आम्हाला मिळणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच म्हटले होते. त्यानुसार भाजपा  आता राज्यसभेची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडणार असल्याचे बोलले जात आहे. आज भाजपाने एकच जागा जाहीर केल्याने आता दुसरी जागा राष्ट्रवादीला सोडल्याचे बोलले जात आहे.

लोकसभेच्या सातारा जागेवरील दावा सोडणाऱ्या नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला होता. हा शब्द अजित पवार यांनी पाळला असून पियुष ओयल यांच्या रिक्त जागी पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नितीन पाटील मुंबईला दाखल झाले आहेत. महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबई विधान भवनात अर्ज भरण्यात येणार आहे. ही निवड बिनविरोध करण्यासाठी महायुतीची रणनिती असल्यामुळे नितीन पाटील खासदार होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.सातारा जिल्ह्याला खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या रुपाने खंबीर नेतृत्व मिळाले होते. त्यानंतर चिरंजीव आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी त्यांची धुरा सांभाळली असून मकरंद पाटील वाई मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत तर नितीन पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत येथील मेळाव्यात सातारा लोकसभेवर दावा सांगत नितीन पाटील यांच्या उमेदवारी देण्याचे सुतोवाच केले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.