- प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे तापलेले बीड जिल्ह्याचे वातावरण आणि त्यात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे नाव गोवले गेल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. मंगळवारी मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि नंतर ते थेट परळीत रवाना झाले.
मुंडे यांची परळीला पाठवण्यामागील कारणे
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात धनंजय मुंडेंचे (Dhananjay Munde) निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण अधिक चिघळले आहे. कराड समर्थकांच्या आक्रमक आंदोलनांमुळे परळी आणि बीड जिल्ह्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या परिस्थितीला हाताळण्यासाठी धनंजय मुंडेंना परळीला पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह महिन्यातील आयसीसी सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी)
मुंडे यांची मोदींच्या बैठकीपासून गैरहजेरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबई दौऱ्यावर असून, महायुतीतील सर्व आमदारांसोबत ते संवाद साधणार आहेत. मात्र, धनंजय मुंडेंना या महत्त्वाच्या बैठकीपासून दूर ठेवले गेले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित आरोपांमुळे मुंडेंची (Dhananjay Munde) प्रतिमा कलंकित झाली असल्याने, त्यांची पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उपस्थिती टाळण्यासाठी त्यांना परळीला पाठवले गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय वर्तुळातील चर्चेला उधाण
मुंडे यांना पंतप्रधान मोदींपासून दूर ठेवण्यासाठीच परळीला पाठवले गेले, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुंडेंचा थेट सहभाग नसला, तरी कराड यांच्याशी जवळीक असल्याने त्यांच्यावर आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंडेंना मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवले गेले का, यावर राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.
(हेही वाचा – Beed NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त)
अमोल मिटकरी यांचे स्पष्टीकरण
आमदार अमोल मिटकरी यांनी मुंडेंच्या (Dhananjay Munde) गैरहजेरीवर भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, परळीत व्यापाऱ्यांनी बंद पुकारला असल्याने धनंजय मुंडे तिथे जाणे आवश्यक होते. त्यांनी वरिष्ठांच्या संमतीनेच हा निर्णय घेतला असल्याचे मिटकरी म्हणाले.
सरकारवर दबाव आणि राजीनाम्याची मागणी
वाल्मिक कराड यांच्यावर झालेल्या मकोका कारवाईनंतर विरोधक आणि काही महायुतीतील नेत्यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अजित पवार यांनी सध्या मुंडेंना (Dhananjay Munde) अभय दिले असले, तरी बीड जिल्ह्यातील परिस्थिती चिघळल्यास सरकारच्या प्रतिमेला धोका होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community