- प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या “देवगिरी” निवासस्थानी सोमवारी समाजसेविका अंजली दमानिया यांनी भेट घेतली. सायंकाळी ७ वाजता झालेल्या या बैठकीत, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक असलेल्या वाल्मिक कराड यांच्यासोबत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे संबंध असल्याचे पुरावे पवार यांना सादर करण्यात आले.
(हेही वाचा – Flower Festival : मुंबईतील पुष्पोत्सवात सुमारे ५ हजार रोपांचा समावेश)
अंजली दमानिया यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व पुरावे पवार यांच्याकडे सुपूर्द केले असून, मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. समाजसेविकेने या प्रकरणात मंत्री मुंडेंवर गंभीर आरोप केले असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
(हेही वाचा – Sharad Pawar आजारी; MVA मध्ये त्राहीमाम!)
या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. या बैठकीत मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात अटक झालेल्या वाल्मीक कराड यांच्या चौकशीत मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव समोर आले आहे. या संदर्भात विरोधकांनी मुंडेंवर हल्लाबोल केला असून, सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या भवितव्यावर उद्याच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community