राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला बीड प्रकरणामुळे Dhananjay Munde गैरहजर? राजकीय चर्चांणा उधाण

45
राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला बीड प्रकरणामुळे Dhananjay Munde गैरहजर? राजकीय चर्चांणा उधाण
राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला बीड प्रकरणामुळे Dhananjay Munde गैरहजर? राजकीय चर्चांणा उधाण

संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येप्रकरणामुळे अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या प्रकरणावरून विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. परिणामी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या शिर्डीतील दोन दिवसांच्या नवसंकल्प अधिवेशनाला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) गैरहजर राहणार असल्याचे समोर आले आहे.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कार्यालयाने त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे कारण दिले असून, ते परळीत आराम करणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा ताण आणि विरोधकांचा दबाव यामुळे मुंडे अधिवेशनाला जाणे टाळत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – Abhishek Nair : सितांशू कोटक यांच्या समावेशानंतर सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरचं स्थान डळमळीत)

दरम्यान, अजित पवार गटाच्या या नवसंकल्प अधिवेशनाला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासारखे नाराज नेते हजर राहणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी स्पष्ट केले आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जात असली तरी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची गैरहजेरी पक्षासाठी मोठा झटका मानला जात आहे.

पक्षांतर्गत वातावरण तापले असताना अजित पवार गटासाठी हा अधिवेशन महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी निवडणुकांपूर्वी पक्षाला एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून होताना दिसत आहे. मात्र, मुंडे यांच्या अनुपस्थितीमुळे गटात नाराजीचे संकेत मिळत आहेत.

(हेही वाचा – मालेगाव प्रकरणी Kirit Somaiya आक्रमक; ‘बोगस जन्म दाखले घेणाऱ्या 110 जणांची यादी पोलिसांना दिली’)

संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येप्रकरणामुळे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना राजकीय दबावाला सामोरे जावे लागत आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेत राजीनाम्याची मागणी जोर धरली आहे. मुंडे यांच्या गैरहजेरीमुळे पक्षाच्या एकत्रित शक्तीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिर्डीतील राष्ट्रवादीच्या या नवसंकल्प अधिवेशनात पक्षांतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर घेतले जाणारे निर्णय आणि पुढील राजकीय दिशा ठरवली जाणार आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या गटबाजीच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.