वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर Dhananjay Munde अडचणीत

मंत्रिमंडळात छगन भुजबळ इन तर धनंजय मुंडे आऊट ?

194
वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर Dhananjay Munde अडचणीत
  • प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची कोंडी झाली आहे. त्यातच वाल्मिक कराड याला खंडणीच्या गुन्हाखाली मंगळवारी अटक झाल्यामुळे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत.

बीडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यामोर्च्यात विविध पक्षांचे नेते देखील सहभागी झाले होते. त्या मोर्च्यात वाल्मिक कराडला अटक करा आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) मंत्रिपदाचा राजिनामा द्या, अशी मागणी विरोधकांकडून केली गेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महायुती सरकारची कोंडी झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचे सांगितले जात आहे. वाल्मिक कराड हे संतोष देशमुखांच्या हत्येचे सूत्रधार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जाते. वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात येत असल्यामुळे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे मंत्रिपद धोक्यात असल्याची चर्चा आहे.

(हेही वाचा – Delhi Assembly Election : भाजपा आणि आप मध्ये ‘पोस्टर वॉर’)

ओबीसी नेता भाजपामध्ये हवा म्हणून हे फक्त नाट्य – अंजली दमानिया

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आले असून, त्यांच्या जागी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे भुजबळ जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहेत. परंतु त्यांच्या नाराजीची दखल पक्षाचे नेते अजित पवार यांनी घेतली नाही. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. भाजपमध्ये ओबीसी नेता हवा म्हणून, हे सर्व नाटक रंगवले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, ओबीसी नेता भाजपामध्ये हवा म्हणून कदाचित हे छान नाटक रंगवले गेले आहे. त्यांना मंत्रिपद द्यायचे आहे. आता भुजबळ म्हणतील, कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी भाजपमध्ये जावे, असे दाखवले जाईल. त्यानंतर त्यांना देवेंद्र फडणवीस आपला पक्षात घेतील. सगळे त्यांचे कुठेतरी एक छान रंगवलेला नाटक आहे, असेच मला वाटते. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन एक महिना देखील उलटला नाही तर आरोप प्रत्यारोपामुळे महायुती सरकारवर मंत्री बदलण्याची पाळी येणार आहे. असंच काहीस चित्र सध्या तरी दिसत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.