-
प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया यांनी कृषी विभागातील खरेदी प्रक्रियेवर गंभीर आरोप केले असले, तरी त्यामध्ये कोणतीही तथ्ये नाहीत, असा स्पष्ट खुलासा माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केला आहे. दमानिया यांनी अर्धवट आणि चुकीची माहिती देऊन मीडियात अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
मुद्दा १ : मंत्रिमंडळ निर्णयाची प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सांगितले की, ३० सप्टेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री महोदयांची मान्यता मिळाल्यानंतर २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या खरेदीला मान्यता देण्यात आली. त्यामुळे दमानिया यांनी जे पत्र बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे, तो दावा चुकीचा आहे.
(हेही वाचा – आग्रा येथे छत्रपतींचे असे स्मारक बांधू कि ते पहायला ताजमहालपेक्षा जास्त लोक येतील Devendra Fadanvis)
मुद्दा २ : कृषी मंत्र्यांच्या टिपणावर गैरसमज
मुंडे (Dhananjay Munde) यांनी स्पष्ट केले की, कृषी मंत्र्यांनी विभागाच्या सचिवांना जे पत्र दिले, ते फक्त एक अंतर्गत टिपण होते. अशा टिपणांवर तारीख नसते, परंतु त्याचा स्विकार आणि नोंदणी प्रक्रिया अधिकृतपणे केली जाते. त्यामुळे दमानिया यांनी टिपणासंदर्भात उपस्थित केलेले आक्षेप चुकीचे आहेत.
मुद्दा ३ : खरेदी अद्याप झालीच नाही
मुंडे (Dhananjay Munde) यांनी स्पष्ट केले की, या निर्णयानुसार अद्याप कोणतीही खरेदी झाली नाही, तर ती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे याआधीच भ्रष्टाचाराचे आरोप करणे हे केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.
(हेही वाचा – फेस रेकग्निशनची कमाल! MahaKumbh मेळ्यात खतरनाक गुंड अडकले कॅमेऱ्याच्या जाळ्यात)
मुद्दा ४ : मंत्र्यांचे अधिकार आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन
भारतीय राज्यघटनेच्या कलम १६६ अंतर्गत मंत्र्यांना त्यांच्या विभागाला आवश्यक निर्देश देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ निर्णयानंतर लगेच पुढील प्रक्रिया सुरू करणे कायदेशीर आहे, असे मुंडे (Dhananjay Munde) यांनी सांगितले.
दमानिया यांच्यावर फौजदारी कारवाईचा इशारा
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, जर दमानिया यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे असतील, तर त्यांनी अधिकृत मंचावर तक्रार दाखल करावी. मात्र, फक्त मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवणे हा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Veer Savarkar यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त सादर होणार ‘माझी जन्मठेप’चा रंगमंचीय नाट्याविष्कार)
प्रसिद्ध कागदपत्रांची सत्यता स्पष्ट
मुंडे (Dhananjay Munde) यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ बैठकीचे अधिकृत कागदपत्रेच माध्यमांनी गुगल ड्राइव्हद्वारे प्रसिद्ध केली आहेत. त्या कागदपत्रांच्या तपासणीवरून २३ सप्टेंबर २०२४ रोजीच हा निर्णय झाल्याचे स्पष्ट होते.
सरकारचा विरोधकांवर पलटवार
या संपूर्ण प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये जोरदार राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. एकीकडे दमानिया भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, तर दुसरीकडे मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्या आरोपांना खोडून काढत प्रतिउत्तर दिले आहे.
आता या प्रकरणाचा शासन आणि न्यायालयीन प्रक्रियेत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community