राज्याच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. संख्याबळाच्याच आधारे महायुतीत पालकमंत्रीपदाचं वाटप झालं आहे. यादरम्यान, चर्चेचा विषय ठरत आहे ते, बीडचं पालकमंत्री पद. मुंडे बंधू आणि भगिनींना बीडचं (Beed) पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडे जालन्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही.
हेही वाचा-BMC : महापालिका मुख्यालयाला टँकरद्वारे पाणी पुरवठा; पिण्याच्या पाण्याचा वापर फ्लशिंगकरता
ही चर्चा सुरू असतानाच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे.” असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे.
बीड… pic.twitter.com/03SR9zzMXT
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 18, 2025
बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो. सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. (Dhananjay Munde)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community