Dhananjay Munde : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरण चांगलचं तापलं असून या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी धनंजय मुंडेंना तातडीने राजीनामा (Dhananjay Munde resigns) दिला आहे. (Dhananjay Munde)
(हेही वाचा – Paytm च्या मुख्य कंपनीस ६११ कोटींची नोटीस; नेमके प्रकरण काय?)
संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh murder case) धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप होत होते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील सातत्याने केली जात होती. त्यानंतर आता धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली जात आहे. त्यासंदर्भात विरोध पक्षाच्या नेत्यांनी ही आक्रमक भूमिका घेत. मुंडे राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, असे सांगितले आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांचे सहकारी प्रशांत भोंबरे, प्रशांत जोशी हे मुख्यमंत्र्यांकडे मुंडेंचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. तसेच यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्यात वेळात अधिकृत घोषणा करणार आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community