धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला; Sunil Tatkare यांनी केले स्पष्ट

30
धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला; Sunil Tatkare यांनी केले स्पष्ट
  • प्रतिनिधी

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कोणताही संबंध नाही, तरीही नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी जबाबदार राजकीय नेता म्हणून राजीनामा दिला, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी स्पष्ट केले.

हत्येतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बीडपासून संपूर्ण राज्यभर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती, असेही तटकरे (Sunil Tatkare) यांनी सांगितले. “या प्रकरणाचा तपास कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय सुरू आहे आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे,” असे त्यांनी नमूद केले.

(हेही वाचा – मुंडेंच्या जागी भुजबळ? – मंत्रिपदाच्या रिक्त जागेवर Chhagan Bhujbal यांची वर्णी लागण्याची शक्यता)

राष्ट्रवादी काँग्रेसचा कायद्यावर विश्वास

तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही गुन्ह्याचे अथवा गैरकृत्याचे समर्थन करत नाही. आजच्या घटनेतून राज्याला हाच संदेश गेला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही.”

अजित पवार यांचे नैतिकतेवर आधीच उदाहरण

तटकरे (Sunil Tatkare) यांनी सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्वीच नैतिकतेच्या मुद्द्यावर स्वतः राजीनामा देण्याचे उदाहरण निर्माण केले आहे. या प्रकरणातही त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. आमचा कायदा आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, न्याय प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही. न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.