धनंजय मुंडे प्रलंबित जात पडताळणी प्रकरणांवर का बोलत नाही?

महाविकास आघाडीचे सरकार गेंड्याच्या कातडीचे व संवेदनहीन आहे. पगार वेळेत होत नसल्यामुळे आतापर्यंत सुमारे २८ एसटी कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या आहेत, असेही प्रविण दरेकर म्हणाले.

109

समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राची तक्रार आल्यास त्याची चौकशी करु, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. एका बाजूला नवाब मलिक वक्तव्ये करणार, नंतर धनंजय मुंडे बोलणार. त्यामुळे याचा अर्थ वानखेडे यांच्याविरुध्द सरकारी पक्षाचा काही नियोजनबध्द कार्यक्रम आहे का, अशी आता शंका उपस्थित होत आहे. इतर जातपाडतळणीच्या प्रलंबित प्रकरणाच्या तपासणीसंदर्भात वा अन्य तक्रारीविषयी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कधी भाष्य का केले नाही, असा सवाल विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण देरकर यांनी उपस्थित केला आहे.

एनसीबी व वानखेडे यांना केवळ टार्गेट करण्याचा डाव दिसत आहे. समीर वानखेडे हे आमचे नातेवाईक नाही वा भाजपाचे ते सदस्य नाहीत, पण अंमली पदार्थविरोधात लढा देणा-या एका कर्तबगार अधिका-याविरोधात असे प्रकार करणे दुर्दैवी आहे. तरीही सरकारला ज्या तक्रारींची चौकशी करावयाची आहे ते खुशाल करु शकतात, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

तर आम्ही उग्र आंदोलन करु!

शेतक-यांच्या बिलातून जुलमी पध्दतीने वीज थकबाकीची वसुली करण्याचा महावितरणाचा निर्णय अन्यायकारक आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना राज्य सरकारने त्यांना बिलामध्ये सूट दिली पाहिजे किंवा वीज बील माफ केले पाहिजे, परंतु उस उत्पादक शेतक-यांच्या वीज बिलाची थकबाकी वसुल करण्याचा फतवा साखर आयुक्तांनी काढला असून हा फतवा अन्यायकारक आहे. शेतक-यांच्या बिलातून थकबाकी कापू नये अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करु, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.

(हेही वाचा : नवाब मलिकांची फसगत, आरोप करण्याच्या नादात भलताच किरण गोसावी झाला ‘टार्गेट’)

एसटीच्या एमडीच्या कार्यालयाला टाळे ठोकू!

महाविकास आघाडीचे सरकार गेंड्याच्या कातडीचे व संवेदनहीन आहे. पगार वेळेत होत नसल्यामुळे आतापर्यंत सुमारे २८ एसटी कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा विषय गंभीर असतानाही एसटीच्या एमडीने परिपत्रक काढून जर एसटीचे कर्मचारी आंदोलन सोडून कामावर रुजु झाले नाही, तर त्या कर्मचा-यांची सेवा समाप्त केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. पण एसटी कर्मचा-यांनी आपल्या मागण्यासाठी न्याय मागायचा नाही का, असा सवाल करतानाच दरेकर म्हणाले की, एसटीच्या एमडीने हे अन्यायकारक परिपत्रक मागे घ्यावे. पण जर असे परिपत्रक काढून एसटी कर्मचा-यांवर दबाव आणाला जात असेल तर एसटीच्या एमडीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.