टोमॅटो नंतर सध्या राज्यात कांद्याचा प्रश्न (Dhananjay Munde) पेटला आहे. कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने ४० टक्के शुल्क लावल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात ठिकठिकणी शेतकरी आंदोलन करत आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे दिल्लीवारी करणार आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन आणि कांद्यावरून सुरु असलेला वाद या मुद्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा करणार आहेत.
कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे आज म्हणजेच मंगळवार २२ ऑगस्ट रोजी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारमधील काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेअंती काही तोडगा निघणार का? की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बंद कायम राहणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
(हेही वाचा – Kurla Wall Collapsed : संरक्षक भिंत घरावर कोसळून १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू)
शेतकरी आक्रमक
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत. तात्काळ केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मी केंद्रीय मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचे धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) म्हटलं होतं. वेळ पडल्यास शेतकऱ्यांचा हितासाठी दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं. तसेच, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी नक्कीच आम्ही मार्ग काढू असा विश्वास देखील धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community