मंत्री धनंजय मुंडे यांनी एका महिलेविरोधात पोलिसांत खंडणीची तक्रार केली आहे. एका परिचित महिलेने ५ कोटींची खंडणी मागितल्याचे मुंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध खंडणी मगितल्याची तक्रार करण्यात आली आहे. आता या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5 कोटी दिले नाही तर…
एका आंतरराष्ट्रीय नंबरवरुन फोन करुन 5 कोटींचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी केल्याची तक्रार मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. या महिलेने पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देऊन ५ कोटींची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण सध्या गुन्हे शाखेला वर्ग करून तपासाला देण्यात आले आहे.
( हेही वाचा:काँग्रेसचे नेते नटवर सिंह यांनी केले मोदी सरकारचे कौतुक )
…म्हणून तक्रार दाखल करण्यात आली
फेब्रुवारी ते मार्च महिन्यात सदर महिलेने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून ५ कोटींचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी केली होती. हे मिळाले नाही, तर समाजमाध्यमांवर बदनामी करण्याची मंत्री मुंडे यांना धमकी देण्यात आली होती . धनंजय मुंडे यांनी या धमकीनंतर ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून ३ लाख रुपये आणि महागडा मोबाईलही कुरियरद्वारे पाठवला होता. मात्र तरीही महिला आणखी ५ कोटींच्या ऐवजाची मागणी करत होती. त्यामुळे मुंडेंनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community