सध्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे दिसत आहे. कारण मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात गेल्या आहेत. मुंडे यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीची मालमत्ता तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या विविध खटल्यांची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवल्याचा दावा करुणा मुंडे यांच्या वकिलांनी केला आहे.
(हेही वाचा ‘आप’च्या जिल्हाध्यक्ष महमूद खानने तरुणीला अडकवले Love jihad च्या जाळ्यात)
याबाबत ४ जानेवारीला न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे वकिलांनी सांगितले. प्रतिज्ञापत्रात माहिती लपवण्यासह करुणा मुंडे यांचा परळी विधानसभा निवडणुकीतील अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद करण्यासाठी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दबाव टाकल्याचा आरोपही करुणा मुंडे यांच्या वकिलांनी केला आहे. करुणा मुंडे यांच्या तक्रारीनंतर धनंजय मुंडे यांच्याविरोधात विविध ठिकाणी खटले सुरू आहेत. मात्र या खटल्यांची माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवल्याचा आरोप आहे. करुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जामध्ये सूचकांच्या नावापुढे केलेल्या सह्या आपल्या नसल्याचे सूचकांनी नामनिर्देशनपत्र छाननी वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे करुणा मुंडे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. (Dhananjay Munde)
Join Our WhatsApp Community